सुवर्ण महोत्सवी वर्ष

५०

कालिका प्रकाशन विश्वस्त मंडळ

दामबाब, १ला मजला, श्री राम मंदिरा जवळ,

मडगांव, गोवा ४०३ ६०१, फोन: ०८३२ २७०२८६५

स्थापना: १९७६

आमच्या विविध उपक्रम

समाज भूषण पुरस्कार

स्वातंत्र्य व लोकशाही रक्षण, संस्कृती संवर्धन, कला, साहित्य, समाजसेवा, उद्योग. शिक्षण, विज्ञान व संशोधन इत्यादि जीवनाच्या एक किंवा अनेक क्षेत्रात निष्ठापूर्वक. निस्वार्थपणे व समर्पित भावनेने कार्य करून असामान्य कर्तृत्व दाखवणाऱ्या व अशा पकारे, मानवी समाजाच्या जागतिक, भारतीय किंवा प्रादेशिक स्तरावर बहुमोल ठसा उमटविणाऱ्या दैवज्ञ ब्राह्मण समाजातील व्यक्तीला समाजभूषण हा पुरस्कार कालिका प्रकाशन विश्वस्त मंडळातर्फे सन्मानपूर्वक देण्यात येतो.
आतापर्यंत असे दोन पुरस्कार देण्यात आले. पहिला समाज भूषण पुरस्कार भारताच्या थोर स्वातंत्र्य सैनिका श्रीमती मथुराबाई लोटलीकर याना बहाल करण्यात आला. १९४२ च्या भारत-छोडो चवळवळीतील एक झुंजार स्वातंत्र्य सैनिका म्हणून ज्यानी भारतीय स्वातंत्र्य-संग्रमात आपले असामान्य कर्तृत्व दाखविले व आपले सबंध आयुष्य भारताच्या स्वातंत्र्य-लढ्यात व नंतर समाजकार्यात घालविले त्या श्रीमती मथुराबाई लोटलीकर ह्या अखिल भारतीय समाजाच्या भूषण आहेत.
दुसरा समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्र- गंधर्व पं. सुरेश हळदणकर यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील असामान्य कर्तृत्वाबद्दल देण्यात आला.
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात व संगीत रंगभूमीवर आपल्या अभिजात गायकीने एकाद्या तेजःपुंज ताऱ्याप्रमाणे तळपत राहून पंडीतजीनी भारतीय संगीत जगतावर आपल्या असामान्य कर्तृत्वाचा बहुमोल ठसा उमटविलेला आहे व अखिल समाजाचे ते भूषण ठरलेले आहेत.

साहित्य पुरस्कार

सर्वोत्कृष्ट मराठी कादंबरीसाठी नाथमाधव पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट मराठी चरित्रात्मक पुस्तकासाठी पु. बा. कुलकर्णी पुरस्कार, विनायकराव देवरूखकर (वैवज्ञ लेखकासाठी). पा. पु. शिरोडकर (संशोधनात्मक पुस्तक), ज्ञानेश्वर ग. कोलवेकर (व्यक्ती-चित्रण संग्रह) आणि डॉ. हरिश्चंद्र तु. नागवेंकर (कोंकणी कथासंग्रह) असे प्रत्येकी तीन हजार रुपयांचे साहित्य पुरस्कार देण्याची योजना कालिका प्रकाशन विश्वस्त मंडळाने १९८५ पासून सुरू केली आहे. दर तीन वर्षांच्या काळात प्रकाशित झालेल्या (प्रथम आवृत्ती) पुस्तकांच्या दोन प्रती मागविण्यात येत असतात. पुस्तकांच्या प्रती संपादक, गोमंत कालिका, दामबाब, श्ला मजला, जुना बाजार, श्री दामोदर मंदिरा जवळ, मडगांव- गोवा ४०३ ६०१ या पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने मागविल्या जातात. लेखकाने सोबत स्वतः विषयी व स्वतःच्या साहित्य जीवनाविषयी थोडक्यात माहिती पाठवून पुस्तक भाषांतरीत किंवा रुपांतरीत नसल्याचा क ते स्वतंत्र असल्याचा उल्लेख करून स्वतःच्या सहीनिशी निवेदन पाठवावे लागते. ही योजना जगाच्या कोणत्याही भागातील लेखकांसाठी खुली आहे. त्यासाठी प्रवेशमूल्य नाही. पुस्तकाच्या प्रती लेखक किंवा प्रकाशक यांच्यापैकी कुणीही पाठवू शकतो. चरित्रात्मक पुस्तकासाठीची योजना एकाच व्यक्तीचे चरित्र असलेल्या पुस्तकाला लागू असते. निकाल प्रसिद्ध झाल्यावर पुस्तकाची एक प्रत लेखक/प्रकाशकाला परत पाठविली जाते.
या योजनेखाली आतापर्यंत देण्यात आलेल्या साहित्य पुरस्कारांचे मानकरी पुढील प्रमाणे आहेतः-